Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव दुचाकीची धडक; पादचाऱ्याचा मृत्यू
Solapur Highway : पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडीत भरधाव दुचाकीने धडक दिल्याने शाहूराज बाराते यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी परिसरात भरधाव दुचाकीने धडक दिल्याने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. शाहूराज लक्ष्मण बाराते (वय ४२) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.