
Pune Accident PMPL Bus Rams Bike Killing Young Man and Woman on the Spot
Esakal
पुण्यात पीएमपीएल बसने दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात दुचाकीवर असलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातल्या कात्रत भिलारेवाडी परिसरात ही दुर्घटना घडलीय. कात्रज घाट वळणावर पीएमपीएल बस आणि दुचाकीची धडक झाली. या प्रकरणी आंबेगाव पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तरुण-तरुणीचा समावेश आहे.