पुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 9 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 August 2017

आज (सोमवार) पहाटे दीडच्या सुमारास हा अपघात झाला आहे. त्र्यंबकेश्वरहून पुण्याकडे निघालेल्या बसला टेम्पोने समोरून धडक दिल्याने हा अपघात झाला. एसटीचा अर्धाभाग पूर्णपणे उखडला आहे. रविवारी रात्री 9 वाजता ही बस त्र्यंबकेश्वरहून निघाली होती. नारायणगावजवळ बस आली असताना बसला अपघात झाला.

पुणे - पुणे-नाशिक महामार्गावर एसटी आणि टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून, 10 जण जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) पहाटे दीडच्या सुमारास हा अपघात झाला आहे. त्र्यंबकेश्वरहून पुण्याकडे निघालेल्या बसने (MH 14 BT 4351) नादुरुस्त टेम्पोने (MH 17 T 4299) समोरून धडक दिल्याने हा अपघात झाला. एसटीचा अर्धाभाग पूर्णपणे उखडला आहे. रविवारी रात्री 9 वाजता ही बस त्र्यंबकेश्वरहून निघाली होती. नारायणगावजवळ बस आली असताना हा अपघात झाला. बसमधील 27 प्रवाशांपैकी 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन टेम्पो चालकांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात 10 7 जण जखमी झाले असून, त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मृतांमध्ये किशोर जोंधळे, रशीद पठाण (टेम्पो चालक, रा. कोकणगाव, ता. संगमनेर), शोभा पवार, यमूना पगार, संकेत मिस्त्री, विकास गुजराथी, सागर चौधरी व दोन आनोळखी स्त्री व पुरूषाचा समावेश आहे. संजीव भावसार, दिपक लांडगे, नंदू पगार, संतोष गुलदगड, सूर्यकांत घाडगे, रमेश शेळके, ज्ञानेश्वरी शेळके, गणेश धोंगडे, सखूबाई शिवमंत, तुकाराम पवार हे जखमी झाले आहेत. नारायणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक व्ही. ए. वाघमारे अधिक तपास करत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune: Accident of ST near Narayangaon; 8 deaths