

पुण्यात वाहतुकीची समस्या गंभीर बनली असून अपघातांची संख्या वाढली आहे.सोमवारी सकाळी कात्रज कोंढवा रस्त्यावर ट्रक अन् दुचाकीच्या अपघातात शिक्षिकेचा दुर्देवी मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी वाहतूक वळवल्याने गंभीर जखमी शिक्षिकेपर्यंत तात्काळ मदत न पोहोचल्यानेच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी केला आहे.