Pune Accident : मुंबई-बंगळूर महामार्गावर टायर फुटला अन् ट्रक उलटला; चालक जखमी

नऱ्हे येथील भूमकर पुलाजवळ अपघात; चालक जखमी
pune accident traffic police Tire burst and truck overturned on Mumbai-Bangalore highway Driver injured
pune accident traffic police Tire burst and truck overturned on Mumbai-Bangalore highway Driver injuredsakal
Updated on

धायरी : मुंबई-बंगळूर महामार्गावर दगडी कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक दुभाजक तोडून रस्त्याच्या पलीकडे जाऊन उलटला. या अपघातात ट्रकचालक सत्यनारायण बद्रिलाल मीना (वय २५, रा. भिलवाडा, राजस्थान) जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास नऱ्हे येथील भूमकर पुलाजवळ घडली.

pune accident traffic police Tire burst and truck overturned on Mumbai-Bangalore highway Driver injured
Pune Accident : मंचरजवळ झालेल्या एसटी अपघातातील जखमींच्या बिलावरून खडाजंगी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने दगडी कोळसा घेऊन निघालेला ट्रक नऱ्हे येथील भूमकर पुलाजवळ आल्यावर ट्रकचा अचानक टायर फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रक दुभाजकाला धडकून उलटला. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र ट्रकचालक जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.

pune accident traffic police Tire burst and truck overturned on Mumbai-Bangalore highway Driver injured
Pune : टॅंकरची प्रतिक्षा सकाळी, हेच आमच्या भाळी

ट्रक महामार्गावर उलटल्याने ट्रकमधील कोळसा महामार्गावर पडला. अंदाजे ४० टन कोळसा रस्त्यावर पसरल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन,

पोलिस निरीक्षक जयंत राजूरकर, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त मौला सय्यद, सहायक निरीक्षक पांडुरंग वाघमारे, प्रशांत कणसे आदी अधिकाऱ्यांसह पोलिस अंमलदारांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली. तसेच, अग्निशमन दलाचे जवान आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून महामार्गावर पडलेला कोळसा आणि ट्रक बाजूला करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.