Pune Accident Video : पुण्यात भीषण अपघात ! फरश्या घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकची तीन वाहनांना धडक, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात घडला आहे.फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटल्याने तीन वाहनांना धडक बसली. दोन वाहनचालक किरकोळ जखमी झाले असून मोठे नुकसान झाले आहे.
पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा मोठा अपघात घडला आहे. फरश्या घेऊन कात्रज चौकाकडून निघालेला ट्रक नवले पुलाजवळ येताच चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रकने तीन वाहनांना धडक दिली. यात दोन वाहन चालक किरकोळ जखमी झाले. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.