Pune Accident : पुण्यातील थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल, भरधाव कार दुचाकीवर आदळली अन्...

Pune Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाकड येथील टिप-टॉप इंटरनॅशनल हॉटेलजवळ एक अपघाताचा थरार घडला. ज्यामध्ये वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवर बसलेल्या एकाचे हॅल्मेट हवेत मागच्या बाजूला उडाले.
Pune car Bike Accident viral video
Pune car Bike Accident viral videoesakal
Updated on

Pune Accident Viral video : पुणे आणि परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातील वाकडमध्ये घडलेल्या एक भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे.. भरधाव कारने दिलेल्या धडकेत दोन बाईकस्वार जखमी झाले आहेत. ही दुर्घटना एका दुसऱ्या कारच्या डॅशकॅम कॅमेऱ्यात कैद झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com