Pune : ड्रग्स तस्कारीतील आरोपी पलायन प्रकरणी मोठी कारवाई; अधिकाऱ्यासंह 9 पोलीस निलंबित

Llalit Patil
Llalit Patil

पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला आरोपी ललित अनिल पाटील (वय ३४) याने पोलिसांना चकवा देवून पलायन केले होते. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी हलगर्जी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली असून एका अधिकाऱ्यासह तब्बल 9 जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे.

Llalit Patil
शिंदे-फडणवीस दिल्लीत.... अजित पवार पुन्हा नाराज? राजकीय घडामोडींना वेग

ललित पाटील ड्रग्स विक्री प्रकरणी ४ कर्मचारी आणि महिला अधिकाऱ्यासह 5 जणांचे निलंबन करण्यात आलं. ललित पाटील हा ड्रग्स तस्करीप्रकरणातील कुख्यात आरोपी होता. काल संध्याकाळी ६ वाजता ललित हा ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून गेला होता.

Llalit Patil
"ती वाघनखं खरचं शिवाजी महाराजांची की...."; काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

याप्रकरणी आता पुणे पोलीस आयुक्तांनी कर्तव्यात कसूर करून कामामध्ये हालगर्जीपणा केल्यामुळे ही निलंबनाची कारवाई केली आहे.

निलंबित केलेले अधिकारी आणि कर्मचारी:

PSI जनार्दन काळे, PC विशाल ठोपले, स्वप्नील शिंदे, दिगंबर चंदनशिव, PSI मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश शिवणकर, नाईक नाथाराम काळे, शिपाई पिरप्पा बनसोडे, शिपाई आमित जाधव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com