

UAE Military Delegation Visits AFMC, Pune
Sakal
पुणे : संयुक्त अरब अमिराती (यूएई) लष्कराच्या तीन वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी), पुणे येथील ‘सशस्त्र सेना संगणकीय औषध केंद्र’ (एएफसीसीएम) आणि वैद्यकीय संशोधन विभागाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व कर्नल सईद मोहम्मद अब्दुल्ला अलअर्दी अलनुआईमी यांनी केले. या वेळी ‘एएफएमसी’चे अधिष्ठाता व डेप्युटी कमांडंट मेजर जनरल अतुल सेठ यांनी या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत केले.