Covid 19 - पुण्यात पुन्हा रुग्णसंख्येत वाढ, दिवसभरात 3 हजारापेक्षा जास्त रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच आज पिंपरी चिंचवडमध्ये ८१४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ८४२, नगरपालिका क्षेत्रात २०० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ७१ नवे रुग्ण सापडले आहेत.

पुणे - पुणे जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात एकूण ३ हजार २९१ नवे  कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.  एकूण रुग्णांत पुणे शहरातील १ हजार ३६४ जण आहेत. दिवसभरात ९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच आज पिंपरी चिंचवडमध्ये ८१४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ८४२, नगरपालिका क्षेत्रात २०० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ७१ नवे रुग्ण सापडले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या २४ तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४६ रुग्ण आहेत. पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी  २१ आणि नगरपालिका क्षेत्रातील सात आणि    कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही काल (ता. २१) रात्री ९ वाजल्यापासून आज (ता. २२) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यात आज ४ हजार ३७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील १ हजार ६१४ पिंपरी चिंचवडमधील ९०५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ७३ , नगरपालिका क्षेत्रातील ४०९ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील ३६ जण आहेत. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता २ लाख १० हजार ५५१झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत ५ हजार ८७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये जिल्ह्याच्या बाहेरील २१७ जण आहेत.

शिक्षकांना न्याय मिळवून द्या; वाचा, कोणी केली मागणी?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune again sees an increase in the number of corona patients