

farmer investment fraud
esakal
पुणे : शेतमालाच्या निर्यात व्यवसायात गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची सुमारे १५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती राज्यभर असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.