पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाहतूककोंडीचा कहर! सलग तिसऱ्या दिवशी १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Pune traffic news today: दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी; वाघोली, सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगाव आणि शिरूर परिसरात वाहतूक मंदावली
Pune-Ahilyanagar Highway Traffic Jam

Pune-Ahilyanagar Highway Traffic Jam

esakal

Updated on: 

Pune Nagar Highway traffic update: दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने पुणे-अहिल्यानगर महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी वाहतूककोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वाघोलीपासून सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगाव ते शिरूरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, काही ठिकाणी ही रांग १० ते १२ किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. पुण्याकडून अहिल्यानगरच्या दिशेने जाणारी वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे.

Loading content, please wait...