Pune Ahilyanagar Traffic: पुणे अहिल्यानगर रस्ता पुन्हा कोंडीत; कासारी फाटा येथे वाहनांच्या रांगा, पोलिस कर्मचारी नेमण्याची मागणी
Kasari Phata traffic: पुणे-अहिल्यानगर मार्गावरील कासारी फाटा येथे सोमवारी पुन्हा तीव्र वाहतूक कोंडी झाली. या चौकातून शिरूर, सणसवाडी, रांजणगाव एमआयडीसीकडे जाणारी मोठ्या प्रमाणात वाहने आणि शालेय विद्यार्थ्यांची गर्दी यामुळे परिसर ठप्प झाला.
तळेगाव ढमढेरे : कासारी फाटा (ता. शिरूर) येथील चौकात पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर सोमवारी (ता. २७) सकाळपासूनच दोन्ही बाजूने वाहतूक कोंडीने कहर केला होता. यामुळे प्रवासी, स्थानिक तसेच वाहनचालक त्रस्त झाले होते.