

Major Chain Accident Near Ranjangaon Ganpati
Sakal
शिरूर : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आरामबसने पुढे असलेल्या मोटारीला धडक दिली. त्यामुळे बस अनियंत्रित झाली आणि दुसऱ्या एका बसवर जाऊन आदळली. पुणे-अहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील खंडाळे माथा परिसरात शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये दोन्ही बससह मोटारीतील १६ प्रवासी जखमी झाले. त्यातील चारजण गंभीर जखमी आहेत.