Pune-Ahmednagar Railway : अहिल्यानगर महामार्गालगत नवा रेल्वे मार्ग; नव्या मार्गासाठी ११ हजार कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज
New Rail Route : पुणे-अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गासाठी ११ हजार कोटींचा प्रकल्प प्रस्तावित असून, ३८ किमी अंतर वाचवणाऱ्या या मार्गाचा सविस्तर अहवाल रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला आहे.
पुणे : पुणे-अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला. हा मार्ग पुणे-अहिल्यानगर महामार्गाच्या बाजूनेच असेल. नवा मार्ग झाल्यास आताच्या तुलनेत ३८ किलोमीटर अंतर वाचेल.