Pune Air Pollution: पुण्याची हवा बिघडतेय! दिवाळीत AQI 427 पार; दिल्लीसारख्या प्रदूषणाच्या दिशेने वाटचाल?

Why is Pune's air quality deteriorating?: दिवाळीच्या रात्री पुण्याचा AQI 427 वर पोहोचून हवा गंभीर श्रेणीत; मात्र, वाहनांचा धूर, बांधकामांची धूळ, वाढते शहरीकरण आणि हिवाळ्यातील प्रतिकूल हवामानामुळे पुण्यात वायुप्रदूषणाचा धोका वर्षभर कायम
Pune Air Pollution: AQI Crosses 427 During Diwali; Is Pune Heading Towards Delhi-Like Pollution?

AQI Crosses 427 During Diwali; Is Pune Heading Towards Delhi-Like Pollution? (Photo Credit - @SHOBHIT060287) 

esakal

Updated on: 

Pune air pollution 2026: पुणे शहराची ओळख एकेकाळी आल्हाददायक हवामान, हिरवळ आणि पर्यावरणपूरक वातावरणासाठी होती. मात्र, वेगाने होणारे शहरीकरण, वाढती वाहनसंख्या, बांधकामे आणि वाहतूक कोंडी यामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न गंभीर बनत आहे. दिवाळीच्या रात्री पुण्याचा वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) सुमारे 427.39 वर पोहोचला. त्यामुळे शहरातील हवा 'गंभीर' श्रेणीत गेली होती. सोमवारी सकाळी हा आकडा 242 वर आला, तरीही हवा 'खराब' श्रेणीत होती.

Loading content, please wait...