

Pune Air Pollution
sakal
वाढत्या वायू प्रदूषणाने पुणेकरांचा श्वास गुदमरत असताना महापालिका मात्र ‘आकड्यांच्या खेळात’ गुंतल्याचे स्पष्ट झाले आहे. हवेत वाढणाऱ्या विषारी घटकांवर आळा घालण्यासाठी ठोस आणि कठोर उपाययोजना अपेक्षित असताना, महापालिकेच्या अर्थसंकल्पात केवळ ‘हवेची गुणवत्ता निर्देशांक’ (एक्युआय) मोजण्यापुरतीच मर्यादित भूमिका दिसून येते.