

Pune AQI poor category
Sakal
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्याची हवा अधिकच विषारी होत चालली आहे. शहरातील शिवाजीनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरासह अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता (एक्यूआय) ‘खराब’ ते ‘अत्यंत खराब’ श्रेणीत नोंदविण्यात आली आहे. ‘राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या पार्श्वभूमीवर नोंदवले गेलेले हे आकडे पर्यावरणासंदर्भातील प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर मोठा प्रश्न उपस्थित करतात,’ अशी भावना पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.