
Pune Air Quality
sakal
पुणे : शहरातील हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांत लक्षणीयरीत्या घसरली आहे. चांगल्या श्रेणीत असलेली हवा आता मध्यम श्रेणीत पोहोचली आहे. पाच ते सहा दिवसांपासून आकाश निरभ्र झाल्यानंतर प्रदूषणाच्या पातळीत झालेला हा बदल स्पष्टपणे जाणवत आहे.