

Pune Airport Travellers Stuck in AeroMall Congestion
Sakal
पुणे : देशांतर्गत विमानाने प्रवास करून प्रवासी तास ते दीड तासांत पुणे विमानतळावर दाखल होतात. मात्र, विमानतळावरून एरोमॉल येथे जाण्यासाठी व एरोमॉल येथून बाहेर पडण्यासाठी त्यांना पुन्हा तेवढाच वेळ खर्ची पडत आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तींचे दौरे असल्यावर पोलिसांकडून एरोमॉलचे दोन्ही गेट बंद केले जातात. परिणामी प्रवासी एरोमॉलच्या ‘कोंडीत’ अडकून पडत आहेत.