
पुणे : पुण्यात सोमवारी झालेल्या पावसाचा परिणाम विमान वाहतुकीवर झाला. दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानाला पुण्यात खराब हवामानामुळे पुणे विमानतळावर उतरता आले नाही, या विमानाला हैदराबाद विमानतळावर उतरावे लागले तर पुण्याहून तीन उड्डाणांना सुमारे तीन तासांचा उशीर झाला. यात दिल्ली, जळगाव व जयपूरला जाणाऱ्या विमानाचा समावेश होता. विमानसेवा विस्कळित झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.