

Pune Airport Expansion Proposal Sent
Sakal
पुणे : पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ३०० एकरहून अधिक जागेची आवश्यकता आहे. यासाठी नुकतेच राज्य सरकारने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठविला आहे. या जागेत धावपट्टीचे विस्तारीकरण, खासगी हेलिकॉप्टर आणि विमानांसाठी स्वतंत्र टर्मिनल, विमानांची देखभाल-दुरुस्तीसाठी स्वतंत्र ‘मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल’देखील (एमआरओ), पार्किंग-बे वाढविणे आदी कामे केली जाणार असून, हा पुणे विमानतळाच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.