Pune Airport: काही सेकंदांत ‘इमिग्रेशन’ पूर्ण; पुणे विमानतळावर लवकरच ‘फास्ट ट्रॅक’ प्रणाली, प्रवाशांचा वेळ वाचणार

Fast Track Immigration: पुणे विमानतळावर लवकरच फास्ट ट्रॅक इमिग्रेशन प्रणाली सुरू होणार आहे. या सुविधेमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा वेळ वाचून प्रवास अधिक सुलभ होणार आहे. रण विमानतळावर लवकरच आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘फास्ट ट्रॅक इमिग्रेशन- ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्रॅम’ ही आधुनिक प्रणाली कार्यान्वित होणार आहे.
Pune Airport

Pune Airport

sakal

Updated on

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. ८ : परदेशात जाणाऱ्या व येणाऱ्या पुणेकरांना आता पुणे विमानतळावर ‘इमिग्रेशन’च्या अधिकाऱ्यांना उत्तरे देण्यासाठी रांगेत तासन्‌तास थांबण्याची आवश्यकता नाही. कारण विमानतळावर लवकरच आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘फास्ट ट्रॅक इमिग्रेशन- ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्रॅम’ ही आधुनिक प्रणाली कार्यान्वित होणार आहे. गृह मंत्रालयाच्या माध्यमातून ही सुविधा देशातील प्रमुख विमानतळांवर सुरू झाली असून पुणे विमानतळावरही सुरू होणार आहे. देशांतर्गत प्रवासासाठी अत्यंत यशस्वी ठरलेल्या ‘डिजियात्रा’च्या धर्तीवर ‘इमिग्रेशन’ची सुविधा असणार आहे.

पुण्याहून परदेशात जाताना किंवा पुण्यात उतरल्यानंतर प्रवाशांना इमिग्रेशन काउंटरवर थांबून अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावे लागते. यात बराच वेळा वाया जातो. त्यामुळे गृह मंत्रालयाने देशातील प्रमुख विमानतळांवर ‘फास्ट ट्रॅक इमिग्रेशन - ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्रॅम’ ही आधुनिक प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही सुविधा पुणे विमानतळावर लवकरच सुरू होणार आहे. तसा प्रस्तावही पाठविला असल्याचा माहिती ‘इमिग्रेशन’च्या अधिकाऱ्याने नाव प्रसिद्घ न करण्याच्या अटीवर दिली. दरम्यान, गृह मंत्रालयाची ही एक महत्त्वाकांक्षी प्रणाली आहे. जी पूर्णपणे बायोमेट्रिक्स (चेहरा ओळखणे आणि फिंगरप्रिंट्स) आणि ऑटोमेशन तंत्रज्ञानावर आधारित आहे. विमानतळावरील अत्याधुनिक ‘ई-गेट्स’द्वारे ही प्रक्रिया पार पडणार आहे.

हे तंत्रज्ञान कसे काम करते?

ही प्रणाली ‘फेशियल रिकग्निशन टेक्नॉलॉजी’वर आधारित आहे. नोंदणीवेळी प्रवाशाचा चेहरा व ठसे यांचा डिजिटल नकाशा डेटाबेसमध्ये जतन केला जातो.

प्रवासी विमानतळावर दाखल झाल्यावर आपला ‘ई-पासपोर्ट’ स्कॅनरवर ठेवतो. प्रवेशद्वारामधील हाय डेफिनेशन कॅमेरा प्रवाशाचा फोटो घेऊन पासपोर्टमधील चीप आणि डेटाबेसची माहितीशी तुलना करतो.

माहिती ९९ टक्के मॅच झाली, तरच हे ई-गेट आपोआप उघडते. ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या ३० सेकंदांत पूर्ण होते.

ही प्रणाली ‘ब्युरो ऑफ इमिग्रेशन’ व ‘इंडियन व्हिसा अँड फॉरेनर्स रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग’शी थेट जोडलेली आहे. त्यामुळे प्रवाशांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? संबंधित प्रवाशांवर प्रवासबंदी आहे का? हे काही सेकंदांत तपासले जाईल.

सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड न करता ही पडताळणी काही सेकंदांत पार पडते.

कोणाला घेता

येणार लाभ?

ज्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे.

भारतीय वंशाचे परदेशी नागरिक या सुविधेसाठी पात्र.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना ftittp.mha.gov.in या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

सुरक्षायंत्रणा पडताळणीनंतर प्रवाशाला पाच वर्षांसाठी विश्वासू प्रवाशाचा दर्जा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com