
Pune Airport
Sakal
प्रसाद कानडे
पुणे : पावसाळ्यात पावसामुळे व हिवाळ्यात दाट धुक्यामुळे पुणे विमानतळावरील विमानसेवा वारंवार विस्कळित होते. वैमानिकांना मार्गदर्शन करणारी ‘कॅट ३ बी’ ही अद्ययावत यंत्रणा येथे नसल्याने वैमानिकांना धावपट्टीवरील महत्त्वाचे मार्किंग दिसत नाही. परिणामी त्यांना पुण्याऐवजी अन्य विमानतळ गाठावे लागत आहे. याचा फटका थेट प्रवाशांना बसतो.