

Pune Airport Lacks 'Green Channel' for Arrivals
Sakal
प्रसाद कानडे
पुणे : आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी अत्यावश्यक असलेली ‘ग्रीन चॅनेल’ची व्यवस्था पुणे विमानतळावर अस्तित्वातच नाही. पुणे विमानतळ प्रशासनाने सीमाशुल्क विभागाला केवळ १० फूट जागा दिली असून, एवढ्या कमी जागेत ‘ग्रीन चॅनेल’ची स्वतंत्र व्यवस्था करणे शक्य नसल्याचे सीमाशुल्क विभागाचे म्हणणे आहे. परिणामी पुणे विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रवाशांना ‘रेड चॅनेल’मधूनच बाहेर पडावे लागते. याचा सर्वाधिक फटका अशा प्रवाशांना बसतो, ज्यांच्याकडे सीमा शुल्क भरावे लागेल अशी कोणतीही वस्तू नसते. जे प्रवासी स्वयंघोषणा (सेल्फ डिक्लरेशन) देऊन बाहेर पडू इच्छितात, त्यांनादेखील ‘रेड चॅनेल’मधूनच बाहेर पडावे लागते. परिणामी, प्रवाशांचा अनावश्यक तपासणीत तास-दीड तासाचा वेळ वाया जातो.