

Pune Airport terminal, which topped the ASQ survey with an impressive 4.96 out of 5 rating for service quality.
Sakal
पुणे: पुणे विमानतळाने एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनलच्या (एसीआय) एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी (एएसक्यू) सर्वेक्षणात २०२५ च्या तिसऱ्या (जुलै-सप्टेंबर) आणि चौथ्या (ऑक्टोबर-डिसेंबर) तिमाहीत पहिला क्रमांक मिळविला आहे. पाचपैकी ४.९६ गुण मिळवत प्रवासी सेवा दर्जामध्ये सुधारणा झाल्यामुळे सेवेच्या दर्जात सातत्याने वाढ झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.