
पुणे : बिबट्या, कुत्र्यांनंतर आता पुणे विमानतळाच्या धावपट्टीजवळ मोरांचा वावरदेखील आढळून आला. शनिवारी पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या (एसजी-९६७) विमानाच्या प्रवाशाने धावपट्टीपासून काही मीटरवर तीन मोरांना गवताळ भागात वावरताना पाहिले. विमान टॅक्सी वेवरून धावपट्टीच्या दिशेने जाताना त्यांनी हे दृश्य पाहिले आहे. मोरांसारखा मोठा पक्षी धावपट्टीजवळ आढळून आल्याने पुन्हा एकदा प्रवासी सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे पक्षी धावपट्टीवर दाखल झाले तर विमान व प्रवासी यांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.