

Pune Airport’s Old Terminal Set for Major Passenger Facility Boost by August
sakal
पुणे : पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलमधील अभियांत्रिकी व विद्युत विभागाची कामे पूर्ण झाली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली उपकरणे अद्याप दाखल झाली नाहीत. मेअखेर उपकरणे टर्मिनलमध्ये बसविली जातील. त्यावेळी ‘बिकास’कडे (ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी) प्रस्ताव सादर केला जाईल. त्यांच्या पाहणीनंतरच टर्मिनल खुले होईल. यासाठी आणखी दोन ते तीन महिने लागतील.