

Pune Airport
Sakal
पुणे - गेल्या आठवडाभरात सातत्याने विमानांचे रद्द होणारे उड्डाण आणि विलंबामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना आता दिलासा मिळू लागला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण रद्द होणारी आणि उशिराने उड्डाण करणारी विमानांची संख्या घटली आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळापत्रकात सुधारणा झाली असून विमानतळाची एकूण कार्यक्षमताही वाढताना दिसत आहे.