Pune Airport: पुणे विमानतळाची उंच ‘भरारी’; नोव्हेंबरमध्ये दहा लाख प्रवाशांची वाहतूक, देशात आठव्या स्थानी
Pune Airport Passenger Traffic: नोव्हेंबर महिन्यात पुणे विमानतळावरून जवळपास दहा लाख प्रवाशांनी प्रवास केला असून देशातील टॉप १० विमानतळांच्या यादीत पुणे आठव्या स्थानी पोहोचले आहे.देशांतर्गत प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत असून आंतरराष्ट्रीय सेवांच्या मर्यादा असूनही प्रवासी वाहतुकीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.
पुणे : प्रवासी संख्येत पुणे विमानतळ देशातील आठव्या स्थानी आले आहे. नोव्हेंबरमध्ये पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या देशांतर्गत प्रवाशांची संख्या ही ९ लाख ५८ हजार ६०२ इतकी झाली.