Pune Airport: खासगी हेलिकॉप्टर, विमानांची भरारी; पुण्यात दिवसाला १२ तर महिन्याला ३२० हून अधिक उड्डाणे
Impact of Air Force Operations on Civil Aviation: पुणे विमानतळावर खासगी हेलिकॉप्टर व विमानांच्या उड्डाणात लक्षणीय वाढ झाली आहे. नॉन-शेड्यूल्ड फ्लाइट ऑपरेशनमुळे उत्पन्न वाढले, मात्र पार्किंग व स्लॉटची अडचण कायम.
पुणे : पुण्याहून खासगी हेलिकॉप्टर व विमानांच्या उड्डाणात वाढ झाली आहे. महिन्याला सुमारे ३२० हून अधिक विमान व हेलिकॉप्टरची वाहतूक पुणे विमानतळावरून होत आहे. निवडणुकांच्या काळात ही संख्या आणखी वाढते.