
पुणे : पुण्याहून भुवनेश्वरच्या दिशेने झेपावण्यासाठी धावपट्टीवर वेगाने धावणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या (आयएक्स -१०९८) विमानाला उड्डाणाच्या क्षणी पक्ष्याची धडक बसली. ताशी २८० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनात पक्षी शिरल्याने सात ब्लेडचे नुकसान झाले. सुदैवाने वैमानिकाने प्रसंगावधान राखत निर्णायक क्षणी उड्डाण थांबविल्याने १४० प्रवाशांचे प्राण वाचले.