सेवा गुणवत्तेच्या सर्वेक्षणात पुणे विमानतळाची क्रमवारी घसरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Airport i

सेवा गुणवत्तेत पुणे विमानतळाची क्रमवारी घसरली; सर्वेक्षणातून माहिती उघड

एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनलच्या विमानतळ सेवा गुणवत्तेच्या (ASQ) सर्वेक्षणात (service quality survey) पुणे विमानतळाची (Pune Airport) क्रमवारी घसरली आहे.विशेष म्हणजे ही घसरण सणासुदीच्या काळात झाली जेव्हा प्रवासी संख्या शिखरावर होती.

गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनलच्या विमानतळ सेवा गुणवत्तेच्या (ASQ) सर्वेक्षणात शहरातील विमानतळाने 81 वा क्रमांक मिळविला होता तर विमानतळाने तिसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) 78 वा क्रमांक मिळवला होता.

हेही वाचा: विकासासाठी जातींचे राजकारण मागे टाकण्‍याची गरज - आमदार रोहित पवार

33 पॅरामीटर्सपैकी, ज्या अंतर्गत विमानतळाला गुण प्रदान करण्यात आले होते, तिसर्‍या तिमाहीच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत सुविधाला त्यापैकी 28 मध्ये कमी गुण मिळाले, परिणामी क्रमवारीत आणखी घसरण झाली. विमानतळ कर्मचार्‍यांचे सौजन्य आणि उपयुक्तता यासारख्या मूलभूत बाबींमध्ये रेस्टॉरंट, खाण्याच्या सुविधा, खरेदी सुविधा, कंफर्ट ऑफ वेटिंग, वॉशरूमची स्वच्छता, टर्मिनलची स्वच्छता, सुरक्षा तपासणी आणि चेक-इनमधील प्रतीक्षा वेळ या सारख्या अनेक बाबींमुळे विमानतळाचे गुण कमी झाले

Web Title: Pune Airport Rank Slips In Service Quality Survey

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top