AI Cameras for Airport Security
Sakal
पुणे
Pune Airport : पुणे विमानतळ आता 'एआय'च्या निगराणीत, ६० गाड्यांवर कारवाई; कॅब-रिक्षांसाठी दोन दिवसांत निश्चित जागा
AI Cameras for Airport Security : पुणे विमानतळाच्या सुरक्षेसाठी परिसरात 'एआय' (AI) आधारित कॅमेरे बसवण्यात आले असून, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लवकरच कॅब व रिक्षांसाठी एक निश्चित जागा (ड्रॉप-ऑफ/पिक-अप पॉईंट) उपलब्ध करून देण्याचा निर्णय वाहतूक पोलिस घेणार आहेत.
पुणे : पुणे विमानतळाच्या सुरक्षेसाठी परिसरातील दोन रस्त्यावर ‘एआय’ आधारित कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्या माध्यमातून आतापर्यंत ६० हुन अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आता वाहतूक पोलिस परिसरातील एखादी जागा कॅब व रिक्षांसाठी निश्चित करणार आहेत. या जागेतच त्यांनी प्रवाशांना सोडून परत जाणे अपेक्षीत असून वेळेचे देखील बंधन असणार आहे. येत्या दोन दिवसांत वाहतूक पोलिस याबाबत निर्णय घेणार आहेत.

