Pune Airport: पुणे विमानतळावर विमानांचा नवा विक्रम! एकाच दिवसात २१९ विमानांची वाहतूक, नवीन शहरांशी कनेक्टिव्हिटी

Pune Airport Sets New Record With 219 Flights In One Day: पुणे विमानतळावर अतिरिक्त स्लॉट आणि नव्या टर्मिनलमुळे उड्डाणांची संख्या झपाट्याने वाढली; एका दिवसात २१९ विमानांची ऐतिहासिक वाहतूक, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला नवी चालना
Pune Airport Sets Aviation Record With 219 Flight Movements In One Day As Connectivity To New Cities Expands

Pune Airport Sets Aviation Record With 219 Flight Movements In One Day As Connectivity To New Cities Expands

sakal

Updated on

पुणे: पुणे विमानतळासाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. विमानतळावर ११० विमानांचे आगमन, तर १०९ विमानांचे प्रस्थान झाले. अशा प्रकारे एकाच दिवसात २१९ विमानांच्या वाहतुकीचा नवा विक्रम प्रस्थापित झाला. मागच्या रविवारी पुणे विमानतळावरून २१६ विमानांची वाहतूक झाली होती. पुणे विमानतळावरून दोन नवीन सेवा सुरू झाल्याने विमानांची वाहतूक वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com