Pune Airport : प्रवासी सुविधांत पुणे विमानतळाची झेप; ५ पैकी ४.९८ गुणांसह देशात प्रथम

विमानतळावर पुरविण्यात येणाऱ्या सेवासुविधांच्या सर्वेक्षणात पुणे विमानतळाने मारली बाजी.
Pune Airport

Pune Airport

sakal

Updated on: 

पुणे - विमानतळावर पुरविण्यात येणाऱ्या सेवासुविधांच्या सर्वेक्षणात पुणे विमानतळाने बाजी मारली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण व कॅनडास्थित एसीआय-एएसक्यू (एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनल-एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी) यांनी जुलै ते सप्टेंबरचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात पुणे विमानतळाचा प्रवासी सुविधांच्या बाबतीतील दर्जा अतिशय चांगला ठरला. पुणे विमानतळाने दर्जाच्या बाबतीत ५ पैकी ४.९८ गुण मिळवत देशात पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.

Loading content, please wait...