
पुणे : पुणे विमानतळाचे ‘हिवाळी वेळापत्रक’ (विंटर शेड्यूल) ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात लागू होणार आहे. याच हंगामात पुणे विमानतळासाठी मंजूर झालेल्या १५ स्लॉटचा विनियोग होईल. त्यामुळे आताचे २२० व नवीन १५ अशा मिळून सुमारे २३५ स्लॉटचा वापर होणार आहे. पुणे विमानतळाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच स्लॉट मिळाले आहेत. यामुळे हिवाळी हंगामात सध्या सुरू असलेल्या मार्गांसह नवीन मार्गांसाठीदेखील पुण्याहून विमानसेवा सुरू होणार आहे. हिवाळी हंगामात पुणे विमानतळ प्रवाशांनी चांगलेच गजबजणार, हे निश्चित आहे.