
पुणे : पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या (एआय ८७४) खिडकीचे आतील बाजूचे आवरण निघाले. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पुण्याहून विमानाने उड्डाण घेण्यापूर्वी काही प्रवाशांच्या ही बाब लक्षात आली. मात्र विमान कंपनीने याकडे दुर्लक्ष करीत दिल्लीसाठी उड्डाण केल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली.