पुण्यातून पहिल्यांदाच मंगळुरूला थेट विमानसेवा

पुण्यातून पहिल्यांदाच मंगळुरूला थेट विमानसेवा
Published on: 

पुणे, ता. २१ : पुणे विमानतळाचे नवीन हिवाळी वेळापत्रक ३० ऑक्टोबरपासून लागू होत आहे. याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसले तरीही मिळालेल्या माहितीनुसार नव्या वेळापत्रकातून देशांतर्गत हवाई कनेक्टिव्हिटीचा काही प्रमाणात विस्तार होत आहे. पुणेकरांना पहिल्यांदाच मंगळुरूसाठी थेट विमानसेवा उपलब्ध होणार आहे. तर दुसरीकडे पुणे-भुवनेश्वरच्या फेऱ्यांमध्ये वाढ होत आहे. बेळगावनंतर हुबळीसाठी असलेली विमानसेवा यात बंद केली जात आहे. याचा फटका मात्र प्रवाशांना बसणार आहे.
पुणे विमानतळाच्या हिवाळी हंगामात विमानतळ प्रशासनाने आणि विमान कंपन्यांनी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे कर्नाटकातील महत्त्वाचे शहर असलेल्या मंगळुरूला पुण्याहून प्रथमच थेट उड्डाण सुरू होत आहे. यामुळे आयटीयन्स, व्यावसायिक आणि पर्यटकांसाठी एक नवा आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होत आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.

हुबळी बंद, भुवनेश्वरला पसंती
या हिवाळी वेळापत्रकात काही मार्गांवर बदलही करण्यात आले आहेत. त्यानुसार, ‘पुणे-हुबळी’ या मार्गावरील विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हुबळीच्या जागी रिकाम्या झालेल्या स्लॉटचा वापर पूर्व भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी केला जाईल. ‘इंडिगो’ने हुबळीच्या जागी आता ‘पुणे-भुवनेश्वर’ या मार्गावरील विमानसेवेचा विस्तार करत उड्डाणांच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी नवीन शहरांना जोडणार
केवळ मंगळुरू आणि भुवनेश्वरच नव्हे, तर या नव्या ‘विंटर शेड्युल’मध्ये देशातील आणखी काही नवीन आणि महत्त्वाच्या शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता, अनेक विमान कंपन्यांनी पुण्यातून नवीन मार्गांवर विमानसेवा सुरू करण्यासाठी स्लॉटची मागणी केली आहे. ३० ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने हे नवीन मार्ग प्रवाशांसाठी खुले होणार असल्याने पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक आणखी गतिमान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

IndiGo Changes Belagavi Delhi Flight Schedule From October 27,
Direct Connectivity to Sindhudurg, Jalgaon, Goa and Agatti
Pune Flyover Projects Near Completion Five Major Bridges Expected To Ease Traffic Congestion In The New Year
Pune Airport Golf Carts
Marathi News Esakal
www.esakal.com