

24 Crore Upgrade Finished; Pune Airport's Old Terminal Yet to Reopen
sakal
पुणे: पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलच्या पुनर्विकासासाठी २४ कोटी रुपयांचा खर्च झाला. आवश्यक ती सर्व कामे झाली, तरीही हे टर्मिनल खुले होण्यासाठी आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे. विमानतळ अथवा टर्मिनल कार्यान्वित होण्यापूर्वी ‘बिकास’च्या (ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी) पथकाने पाहणी करून त्याला मंजुरी देणे आवश्यक आहे. मात्र पथकाने पाहणीच केली नसल्याने आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे.