Pune : उपमुख्यमंत्र्यापेक्षा विरोधीपक्ष नेत्यांचे काम जास्त; अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवार

Pune : उपमुख्यमंत्र्यापेक्षा विरोधीपक्ष नेत्यांचे काम जास्त - अजित पवार

पुणे : राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार पाहताना जिल्ह्यातील संस्थांच्या कामांना वेळ मिळत नव्हता. म्हटलं विरोधी पक्षनेता झाल्यावर संस्थांच्या कामाकडे अधिक लक्ष देऊ. पण राज्याचे विरोधी पक्षनेत्यांचे काम उपमुख्यमंत्र्यापेक्षा जास्त असून, आता वेळ कमी पडत आहे, अशी कबुली राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि गुणवंत विद्यार्थी पुरस्कार समारंभात ते बोलत होते. आपल्या कामाच्या झपाट्यासाठी ओळखले जाणारे अजित पवार यांनी सध्याची जबाबदारी अधिक व्यस्ततेची असल्याचे कबूल केले आहे. उपमुख्यमंत्री पदाचा कार्यकाळापेक्षा विरोधी पक्षनेते काम अधिक आव्हानात्मक असल्याचे पवार म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर रुपाली चाकणकर, प्रशांत जगताप, शिक्षण आदी उपस्थित होते. पवार म्हणाले,"विरोधी पक्षनेते म्हणून राज्यातील प्रत्येक घटनेची दखल घ्यावी लागते. राज्यातील विकास प्रकल्प आणि उद्योग बाहेर जात आहे. वाढती बेरोजगारी पाहता, हे प्रकल्प बाहेर जाऊ नये म्हणून लढावे लागते. त्यामुळं आता अधिक जास्त काम वाढले आहे." निर्णय घेणाऱ्या पदावर बसलेल्या व्यक्तींकडे पाठपुरावा करणे चुकीचे नसल्याचे पवार म्हणाले.