पुणे: स्लॅब दुर्घटनेतील कामगारांना अजित पवारांकडून श्रद्धांजली; पाच लाखांची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

पुणे: स्लॅब दुर्घटनेतील कामगारांना अजित पवारांकडून श्रद्धांजली; पाच लाखांची मदत

मुंबई : पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या पाच कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या असून उपमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. (Ajit Pawar)

हेही वाचा: बंडातात्या सातारा पोलिस ठाण्यात स्वतः हजर; शहरात कडेकोट बंदोबस्त

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य जखमी कामगारांवर उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असून त्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा: नितेश राणेंचा आज फैसला! नारायण राणे दिल्लीतून कोकणात दाखल

नेमकं काय घडलं?

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना येरवडामधील शास्त्रीनगरमध्ये असलेल्या गल्ली क्रमांक आठमध्ये गुरुवारी (ता.3) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत पाच कामगार जखमी झाले आहेत. तर सुमारे दहा कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.(Pune Building collapse)

Web Title: Pune Ajit Pawar Pays Tribute To Slab Accident Workers Five Lakh Help To Family Members

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsAjit Pawar