esakal | Pune:अजितदादांची प्रसारमाध्यमांवर आगपाखड
sakal

बोलून बातमी शोधा

PUNE

Pune:अजितदादांची प्रसारमाध्यमांवर आगपाखड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे:"बारामती येथील एका जमीन व्यवहार प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल, अशी बातमी काल एका चॅनेलने दाखवली. माझा दुरान्वयानेही संबंध नसताना धादांत खोटा आरोप करण्यात आला. कशासाठी हे धंदे करता? तुम्हाला खऱ्या बातम्या द्यायला काय होतं. वास्तविकता कन्फर्म करा ना. नेमके काय झाले," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांवर आगपाखड केली.

महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पवार म्हणाले, "राज्य सहकारी बँकेतही धाडी पडल्या? कुठे धाड पडली, मी याबाबत सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे विचारणा केली. काहीही बातम्या देतात. मीडियाला बातम्या देण्याचा अधिकार आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील लोकांना मीडियाबद्दल आदरच आहे याबद्दल दुमत नाही. परंतु जनतेच्या मनातील विश्वासार्हता कमी होऊ नये, यासाठीही प्रसारमाध्यमांनी लक्ष देण्याची गरज आहे."

हेही वाचा: गणेशोत्सवामध्ये पुण्यात नवे निर्बंध नाहीत, पण... - अजित पवार

संबंधित चॅनेलवर कारवाई करणार का, याबाबत पवार म्हणाले, "कायदेशीर कारवाई करण्यासाठी मला काही तेवढाच उद्योग नाही. आमच्यामागे भरपूर कामे आहेत. त्याच्यासाठी वकील द्या. अमकं द्या तमकं द्या. एवढेच धंदे आहेत का आम्हाला? आम्ही सकाळी सहा-सात वाजल्यापासून कामाला लागतो. फक्त याची नोंद सर्व मीडिया, चॅनेल आणि ते चालविणाऱ्या संपादकांनी घ्यावी एवढीच कळकळीची विनंती आहे.

loading image
go to top