

Pune Ajni Vande Bharat
sakal
पुणे : यंदा दिवाळीच्या सुट्यांमध्ये पुणे-अजनी (नागपूर) वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. १७ ते २८ ऑक्टोबरदरम्यान म्हणजे बारा दिवसांत तब्बल १४५ टक्के प्रवाशांचा प्रतिसाद लाभला आहे. १४ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला असून, यातून रेल्वेला सुमारे दोन कोटी ६३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.