Pune PMPL Bus
sakal
पुणे
Pune PMPL Bus: आळंदीत ‘पीएमपी’चे चार एकरांत आगार; राज्य परिवहन महामंडळाची जागा मिळणार, सुमारे ८० बसची व्यवस्था
Location and Land Allocation: राज्य परिवहन महामंडळाची आठ एकरपैकी चार एकर जागा ‘पीएमपी’ प्रशासनाला दिली जाणार आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे ‘पीएमपी’ने पाठविलेल्या प्रस्तावाला एसटी प्रशासनाने मान्यता दिली आहे.
पुणे : राज्य परिवहन महामंडळाची आठ एकरपैकी चार एकर जागा ‘पीएमपी’ प्रशासनाला दिली जाणार आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे ‘पीएमपी’ने पाठविलेल्या प्रस्तावाला एसटी प्रशासनाने मान्यता दिली आहे. लवकरच एसटीची चार एकर जागा ‘पीएमपी’ प्रशासनाच्या ताब्यात येणार आहे. या जागेत मोठे आगार बांधणार आहे. सुमारे ८० बस येथे थांबू शकणार आहेत.

