

Woman Sanitation Worker Dies in Rickshaw Car Accident in Pune
esakal
विश्रांतवाडी : आळंदी रस्त्यावरील मेंटल कॉर्नर चौकात रविवारी सकाळी ६:३० वा. भरधाव कारने रिक्षाला धडक दिल्याने महिला सफाई कामगाराचा मृत्यू झाला. संगीता अनिल साठे (वय ५१, रा. शांतीनगर, येरवडा) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या पुणे महापालिकेत कंत्राटी सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या.