Pune : आंबेगाव तालुक्यात विद्यार्थिनींशी गैरवर्तन; शिक्षकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Pune : आंबेगाव तालुक्यात विद्यार्थिनींशी गैरवर्तन; शिक्षकाला अटक

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक बाबाजी उमाजी घोडे (रा.निमगाव सावा) याने इयत्ता सातवीच्या अल्पवयीन अनेक विद्यार्थिनीं सोबत विकृत चाळे केले आहेत. याप्रकरणी पारगाव पोलीस ठाण्यामध्ये गु.र.नं.346/2022.भा.द.वि.क.354 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8,12 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून शिक्षकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी केंद्रप्रमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित शिक्षक बाबाजी घोडे हा इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे शरीराला स्पर्श करून बोलणे अशा प्रकारे विकृत चाळे करत गैरवर्तन करत होता. जून महिन्यापासून असा प्रकार सुरू होता. याप्रकरणी मुलींनी आपल्या पालकांना याबाबत सांगितले असता, पालकांनी 24 ऑगस्ट रोजी शाळेत जाऊन या संदर्भात तक्रार केली. शाळेने या तक्रारीची दखल घेऊन गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्याशी संपर्क साधला. श्री.पठारे यांना काही पालकांनी फोन करून घडलेला प्रकार सांगितला. श्री. पठारे यांनी या प्रकरणी एक समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले होते. या समितीने संबधित वर्गातील मुलींशी संवाद साधत चौकशी केली.

समितीने सातवीच्या वर्गातील अठरा मुलींची चौकशी केली. त्यातील तेरा मुलीबाबत हा प्रकार घडला असल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे.त्यामुळे या शिक्षकावरील आरोप सिद्ध झाला आहे. सदर शिक्षकास गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्या आदेशाने निलंबित केले आहे. शिक्षक व विद्यार्थी या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नराधम शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे करत आहेत.

यासंदर्भात गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले आंबेगाव तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा या ठिकाणी स्वयंसेवी संस्थेची मदत घेऊन जनजागृती करणार आहोत. जनजागृतीमुळे विद्यार्थिनी व पालक तक्रार करण्यास पुढे येतील त्यामुळे पुन्हा आशा घटना घडणार नाही. शिक्षकांनी ज्ञानदानाचे पवित्र काम करावे. विद्यार्थ्यानबरोबर अशा प्रकारे गैरप्रकार होणार नाही. याची काळजी घ्यावी असे सांगितले.

Web Title: Pune Ambegaon Abuse Girl Minor Students Teacher Arrested Molesting Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..