Pune Leopard News : दोन महिने हुलकावणी देणारी मादी अखेर पिंजऱ्यात; पवार मळ्यात वनविभागाची मोठी कारवाई, सीसीटीव्हीत दिसलेलं बिबट्यांचं कुटुंब

Leopard Captured After Two Months in Nagapur Village : नागापूर (ता. आंबेगाव) येथील पवार मळा परिसरात दोन महिन्यांपासून वावरणारी अडीच वर्षांची बिबट मादी अखेर वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केली. परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Ambegaon Pune Forest Department Action

Ambegaon Pune Forest Department Action

esakal

Updated on

निरगुडसर (पुणे) : नागापूर (ता. आंबेगाव) येथील पवार मळ्यात आज पहाटे अडीच वर्षांची बिबट मादी जेरबंद (Pune leopard news) झाली. दोन महिन्यांपूर्वी मादीसह तीन बिबटे आणि दोन पिल्ले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Ambegaon leopard capture) झाले. त्यानंतर वनविभागाने पिंजरा लावला पण बिबट्याकडून सतत हुलकावणी मिळत होती. अखेर दोन महिन्यानंतर ही बिबट मादी पिंजऱ्यात अडकली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com