Pune : आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात,५४ कोटी ८० लाख रुपयांच्या कामांना मंजूरी; सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील

आदिवासी क्षेत्रासाठी २९ कोटी ८० लाख रुपये
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilSakal

मंचर - आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील जुलै २०२३ मध्ये राज्य शासनाच्या पुरवणी अर्थसंकल्पात रस्ते, लहान पूल व भौमितिक सुधारणा कामांसाठी आदिवासी क्षेत्रासाठी २९ कोटी ८० लाख रुपये व बिगर आदिवासी क्षेत्रासाठी २५ कोटी रुपये अशी एकूण ५४ कोटी ८० लाख रुपयांच्या १८ कामांना मंजूरी देण्यात आलेली आहे.” अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

मंजूर झालेली कामे व रक्कम -

आंबेगाव तालुका आदिवासी क्षेत्र - कुशिरे खुर्द, कुशिरे बुद्रुक ते महाळुंगे रस्ता - चार कोटी रुपये, डिंभे- बोरघर-आहुपे रस्ता - तीन कोटी ५० लाख रुपये, तळेघर- फलोदे - पाटण रस्ता - चार कोटी रुपये, वैदवाडी - ढाकाळे रस्ता पाच कोटी रुपये, राजेवाडी ते म्हसळेवाडी- सागाची वाडी रस्ता – दोन कोटी रुपये, पोखरी ते साबाळेवाडी रस्ता - तीन कोटी रुपये, बोरघर- तांबे रस्ता- दोन कोटी रुपये, डोण ते हातविज रस्ता – एक कोटी ५० लाख रुपये, माळीण-पसारवाडी ते लेंभेवस्ती रस्ता - तीन कोटी रुपये, पिपरगणे - वाघोबाची वाडी रस्ता एक कोटी ८०लाख रुपये.

Dilip Walse Patil
Mumbai Crime : खून करून फरार झालेल्या कैद्याला तीन महिन्यांच्या निरंतर पाठलागानंतर अटक

बिगर आदिवासी भाग

रांजणगाव मलठण पारगाव-नारायणगाव रस्ता घोडनदीवर मोठया पुलाचे व पोहोच मार्गासाठी भूसंपादन एक कोटी ५० लाख रुपये, बेल्हे - लाखणगाव पाबळ रस्ता घोडनदीवर पुलाचे व पोहोच मार्गासाठी भूसंपादन- ५० लाख रुपये, घोडेगाव-नारोडी –कळंब- खडकी –निरगुडसर- लोणी सविंदणे रस्ता लहान पुलाचे बांधकाम भौमितिक सुधारणेसह रस्त्याची सुधारणा –पाच कोटी रुपये, भाकरेवाडी – भैरवनाथवाडी - टाकळी हाजी-म्हसे ते डोंगरगण रस्ता – चार कोटी रुपये, घोडेगाव- नारोडी – कळंब-निरगुडसर- लोणी- सविंदणे लहान पुलाचे बांधकाम व रस्त्याची भौमितीक सुधारणा –एक कोटी ५० लाख रुपये,

Dilip Walse Patil
Mumbai News : वाहतूक पोलिसांवर आली खड्डे बुजविण्याची वेळ; केडीएमसी प्रशासन मात्र सुस्तच

शिरूर तालुका

शिक्रापूर-पिंपळेखालसा - हिवरे- कवठे-फाकटे-चांडोह रूंदीकरण व मजबुतीकरण – चार कोटी रुपये, शिकापूर - गणेगाव खालसा -मलठण टाकळी हाजी जांबुत रस्ता रूंदीकरण- डांबरीकरण पाच कोटी ५० लाख रुपये, शिक्रापूर - जातेगाव खुर्द - करंदी प-हाडमळा केंदूर कनेरसर सुधारणा- तीन कोटी रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com