
Pune : अंधार असतानाही मोबाईलच्या उजेडात शेतात जाऊन गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांची केली पाहणी
पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील गावात काल शनिवारी सायंकाळी गारपीटीचा जबरदस्त तडाखा बसला गारांच्या माऱ्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या भागातील वीज पुरवठा बंद पडल्याने सर्वत्र अंधार होता या अंधारातही जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी या भागाला भेट देऊन मोबाईलच्या उजेडात शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
काल शनिवारी सायंकाळी साडेचार पाच वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच सुपारी व लिंबाच्या आकाराएवढ्या मोठ्या गारा पडू लागल्या. गारांचा खच तयार झाला पोंदेवाडी, खडकवाडी, जारकरवाडी, वाळुंजनगर, रोडेवाडीफाटा, बढेकरमळा, द्रोणागिरीमळा, लाखणगाव, ज्ञानेश्वरवस्ती या परिसरात गारांमुळे कांद्याच्या पिकांचे शेंडे मोडून पडले कांदा पिकांचे त्याचबरोबर मिरची, कलिंगड, फ्लावर, काकडी, भुईमुग, गहू या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
जोराच्या वाऱ्यामुळे या परिसरातील वीज पुरवठा बंद पडल्याने सर्वत्र अंधार होता या अंधारातही काल शनिवारी रात्री जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी या भागाला भेट देऊन मोबाईलच्या उजेडात शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली व संबधित शेतकऱ्यांशी संवाद साधला.